संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

कोल्हापुरात आढळले देशातील सर्वात मोठे कोंबडीचे अंडे !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापुर – कोंबडी आधी की अंडे आधी ? अंडे शाकाहारी की मांसाहारी? अशा चर्चा कायमच होत असतात पण सध्या कोल्हापुरात एका कोंबडीने दिलेले अंडे चर्चेचा विषय बनला आहे. हातकणंगले तालुक्यातील तळसंदे गावातील कोंबडीने सर्वात मोठे अंडे दिले आहे.
तळसंदे गावातील दिलीप चव्हाण यांच्या पोल्ट्रीमध्ये हे अंडे मिळाले आहे.हे अंडे देशातील सर्वात मोठे अंडे आहे,असा दावा पोल्ट्रीचे मालक दिलीप चव्हाण यांनी केला आहे.सामान्यपणे कोंबडीच्या अंड्याचे वजन ७० ग्रॅमपर्यंत असते.पण या अंड्याचे वजन वाचूनच तुम्हाला धक्का बसेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या अंड्याचे वजन जवळपास २१० ग्रॅम इतके आहे.सामान्य वजनाच्या तब्बल तीनपट आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami