कोल्हापुर -देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आचार्य श्री चंद्रप्रभसागर महाराज व आचार्य श्री प्रसन्नसागर महाराज यांच्या प्रेरणेने उद्या रविवार ६ नोव्हेंबर पासून शिरोळ तालुक्यातील धर्मनगर ते झारखंडमधील सम्मेद शिखरजीपर्यंत शांती सद्भावना सायकल यात्रा काढली जाणार आहे.२१०० किलोमीटरचा प्रवास करून ही २५ नोव्हेंबरला ही यात्रा शिखरजी येथे पोहोचल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.
या यात्रेमध्ये गुरुभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील भाविकांकडून अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, पर्यावरण, मातृभाषा, राष्ट्र भाषा, राष्ट्रीय एकात्मता, संवर्धन, शांती सद्भावना यात्रा आणि श्री सम्मेद शिखरजी पर्वत स्वच्छता मोहीम सुरू आहे. त्या अंतर्गत विद्यासन्मतिदास सेवा संस्था,चंदाबाबा सेवा प्रतिष्ठान धर्मनगर व अंतर्मना गुरुभक्त परिवार,सायकल चालवा -देश वाचवा सायकल ग्रुप वीराचार्य अकादमी, धर्मनगर यांच्या वतीने धर्मनगर ते सम्मेद शिखरजी अशी शांती सद्भावना सायकल यात्रा काढण्यात येणार आहे.