कोलकत्ता – शहरातील शेठ सुखलाल करनानी मेमोरियल हॉस्पीटला (एसएसकेएम) गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान १० फायर इंजिनसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अनेक तास झुंज देऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने त्यात जीवित हानी झाली नाही, अशी माहिती अग्निशामन दलाच्या जवानांनी दिली.
कोलकात्याच्या एसएसकेएम रुग्णालयाच्या सीटी स्कॅन रूमला गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्याची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अनेक तास झुंज देऊन आग नियंत्रणात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र मोठी आर्थिक हानी झाली. रुग्णालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीचे नेमके कारण कळले नाही, अशी माहिती अग्निशामन दलाच्या जवानांनी दिली.