संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

कोर्टाच्या निर्णयामुळे शिंदे गटातील सोनावणे यांची आमदारकी धोक्यात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जळगाव:- शिवसेना आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिंदे गटासह आमदार सोनावणे यांना धक्का बसला आहे. आमदार सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्राबाबत हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला असल्याची माहिती चोपड्याचे माजी आमदार जगदीश वळवी यांनी दिली. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. आता अपात्र झाल्या असल्याने शिंदे गटाचे संख्याबळ एकने कमी होणार आहे.

लता चंद्रकांत सोनवणे यांनी २०१९ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. चोपडा विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातीच्या आरक्षीत जागेवरून त्या विजयी झाल्या होत्या. माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी त्यांच्या निवडीला आव्हान देत सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती.

सुप्रीम कोर्टाच्या द्विसदस्यीय घटनापीठाचे सदस्य न्या.के.एम. जोसेफ व न्या. ऋषिकेश रॉय यांनी आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे. मात्र लता यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका सादर करणार आहोत. तसेच या निर्णयाने आमदारकी रद्द होणार नसल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami