संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

कोरोना रुग्णसंख्येचा वेग थांबेना; २४ तासांत १२,७८१ नव्या रुग्णांची नोंद

coronavirus disease covid-2019, coronavirus, corona-5060427.jpg
Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आज सकाळी ८ वाजता समोर आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात २४ तासांत कोरोनाचे १२,७८१ नवे कोरोना रुग्ण आढळले. यासह देशातील सक्रिय रुग्णसंख्या ७६,७०० वर पोहोचली. जी देशासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. तसेच २४ तासांत १८ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींचा आकडा ५,२४,८७३ वर पोहोचला आहे. तसेच या आजारातून बरे झालेल्यांची संख्या ४,२७,०७,९०० इतकी आहे.

रविवारची आकडेवारी पाहता, कोरोनाचे १२,८९९ नवे रुग्ण आढळले होते, तर १५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. या तुलनेत आज कमी रुग्णांची नोंद झाली, मात्र मृत्यूसंख्या वाढली. तर, शनिवारी १८ जून रोजी देशात १३,२१६ नवे कोरोना रुग्ण आढळले होते. ११३ दिवसांत पहिल्यांदाच देशात १३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. आठवडाभरापासून देशात दररोज १२ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही नव्या लाटेची लक्षणे नसून लोकांमधील वाढत्या निष्काळजीपणाचे परिणाम आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami