संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या राज्यांना महत्त्वपूर्ण सूचना

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – गेल्या दोन आठवड्यांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वेगाने वाढ होत आहे. या आजारावर मोठ्या शर्थीने मिळवलेले नियंत्रण आता वाया जाता कामा नये. यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी खबरदारीची सूचना केली आहे. संसर्ग पुन्हा आटोक्यात आणण्यासाठी रुग्णवाढीच्या ठिकाणी चाचण्या, देखरेख, उपचार, लसीकरण आणि कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन या पंचसूत्रीचा वापर करा, अशी सूचना केंद्र सरकारकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली आहे.

दरम्यान, देशात गुरुवारी दैनंदिन रुग्णसंख्या ९९ दिवसांनंतर सात हजारांपेक्षा अधिक नोंदवली गेली. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत देशभरात ७,२४० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, ८ बाधितांनी आपला जीव गमावला. ही गंभीर परिस्थिती पाहता आता नागरिकांनीही आपापली काळजी घेणे हिताचे आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami