संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

कोरोना काळात प्रसिद्ध झालेल्या डोलो-६५० गोळीच्या कंपनीवर छापे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बंगळुरू – कोरोना काळात ताप, अंगदुखी साठी प्राधान्याने वापरल्या गेलेल्या डोलो ६५० गोळ्यांचे उत्पादन करणाऱ्या मायक्रो लॅब्जच्या मालकांच्या घरी आणि देशातील विविध शहरातील कारखान्यांवर असे एकूण ४० ठिकाणी आयकर विभागाने काल बुधवारी छापे घातले. करचुकवेगिरी प्रकरणी हे छापे घालण्यात आल्याचे समजते. कंपनीच्या बंगळुरू येथील मुख्यालयातून अनेक महत्वाची कागदपत्रे आयकर विभागाने ताब्यात घेतली असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप सुराणा आणि निदेशक आनंद सुराणा यांच्या निवासस्थानांवर छापे घातले गेले. आयकर विभागातील सुमारे २०० कर्मचाऱ्यांच्या टीमने एकाचवेळी विविध शहरातील कंपनीच्या प्रकल्पांवर छापे टाकले आहेत.

अधिका-यांनी सांगितले की, आयकर विभाग तपासाचा एक भाग म्हणून कंपनीचे आर्थिक रेकॉर्ड आणि स्टेटमेंट तपासत आहे. छाप्याच्या तपशीलाबाबत विभागाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी मालकांवर करचुकवेगिरीच्या संशयावरून विभागाने ही कारवाई केली आहे. याबाबत अधिकृतरित्या काहीही सांगितले गेलेले नाही.मायक्रो लॅब्स लिमिटेड ही फार्मास्युटिकल उत्पादने आणि एपिआयचे उत्पादन आणि वितरण करण्यात गुंतलेली आहे.परदेशी व्यवसायाव्यतिरिक्त, कंपनीचे देशभरात १७ उत्पादन युनिट्स आहेत.

दरम्यान, कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, २०२० मध्ये कोविड महामारी सुरू झाल्यापासून, कंपनीने डोलो-६५० च्या ३५० कोटीहून अधिक गोळ्या विकल्या आहेत आणि गेल्या एका वर्षात सुमारे ४०० कोटी रुपये कमावले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami