संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

कोरोनानंतर आता नोरोव्हायरस
केरळमधील दोन मुलांना संसर्ग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत असताना आता केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केरळमध्ये पुन्हा एका नवीन विषाणूने प्रशासनाची झोप उडवली आहे. नोरोव्हायरस असे या व्हायरसचे नाव असून केरळमधील दोन मुलांमध्ये या विषाणूची लक्षणे आढळून आली आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, आरोग्य विभाग परिस्थितीचे आकलन करत आहे, काळजी करण्याची गरज नाही. मुलांची प्रकृती स्थिर आहे.
नोरोव्हायरस हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे, जो सामान्यतः दूषित पाणी, दूषित अन्न आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो. केरळच्या तिरुवनंतपूरमच्या विहिंजममध्ये नोरोव्हायरसचा नवीन संसर्ग समोर आला आहे. संसर्ग झालेल्या दोन मुलांव्यतिरिक्त इतर मुलांच्या चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शाळेत वाटप करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनातून या मुलांना विषबाधा झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. नोरोव्हायरसमध्ये सुरुवातीला उलट्या आणि किंवा अतिसाराचा त्रास होतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी हा त्रास सुरू होतो. रुग्णांना मळमळ, पोटदुखी, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीचाही त्रास होतो.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami