संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

कोरियोग्राफर गणेश आचार्यला
लैंगिक शोषण प्रकरणात जामीन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यला मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने लैंगिक शोषण प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. महिला डान्सरने २०२० मध्ये आचार्यविरोधात लैंगिक शोषण आणि मारहाणीचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आचार्य विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने आचार्यला जामीन मंजूर केला. गणेश आचार्यच्या कार्यालयात आपल्याला अश्लील व्हिडीओ दाखवण्यात आला. अश्लील शेरेबाजी केली गेली. त्याला आपण विरोध केला तेव्हा आचार्यने आपणास त्रास देण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्याने मारहाणही केली, असा आरोप करून तिने आचार्य विरोधात तक्रार नोंदवली होती. मात्र सदर महिलेचे सर्व आरोप गणेश आचार्यने फेटाळले होते. या प्रकरणात आता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami