मुंबई
राज्यातील तापमान दिवसंदिवस वाढत असताना आता हवामान खात्याने रायगडसह कोकणातील काही भागांत पुढील 2 दिवस उष्णता वाढणार अंदाज वर्तवला आहे. तेथे कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअस राहणार आहे. पुढील पाच दिवसांत विदर्भामध्ये पारा आणखी वाढणार आहे. नागपूरसह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीत पारा वाढून 40 अंशांच्या वर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा जाणवायला लागल्याने राज्यातील नागरिक हैराण झाले आहे. अशात हवामान खात्याने अंदाज वर्तवताना सांगितले की, कोकणात पुढील चार ते पाच दिवस आकाश निरभ्र असल्यामुळे सूर्याची किरणे अधिक तापदायक ठरू शकतात. दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असे हवामान सध्या विदर्भात सर्वत्र आहे.