संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 28 January 2023

कोकण कन्या रेल्वेचे इंजिन बिघडल्यामुळे प्रवाशांचे हाल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : कोकण रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मडगाव ते मुंबई धावणारी कोकण कन्या एक्स्प्रेस कोकिसरे ते वैभववाडी रेल्वे स्टेशनदरम्यान बंद पडली. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास विस्कळीत झाली. या मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक कोलडमडले. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील चाकरमानी आणि कोकणी प्रवाशांचे मात्र हाल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार,आज सकाळी आठच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कोकण कन्या एक्स्प्रेस मुंबईहून गोव्याकडे जात असताना कोकिसरे रेल्वे फाटकापासून काही अंतरावर अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ट्रेन बंद पडली. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत राजापूर स्टेशनवरुन नवीन इंजिन उपलब्ध करण्यात आले असून इंजिन बदलण्यात आले आहे. इंजिनामधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी आणखी अर्धा ते एक तास प्रवाशांना वाट पहावी लागली. वेळा चुकल्यामुळे प्रवाशांना देखील याचा बराच त्रास सहन करावा लागतो.
दरम्यान, इंजिन बिघाडामुळे कोकण कन्या एक्स्प्रेस बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील जवळपास सर्वच गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत झाले. विशेषतः कोकण कन्या एक्स्प्रेसचं आरक्षण नेहमीच फुल्ल असतं. दरम्यान, कोकणी चाकरमान्यांची लाडकी असलेली कोकणकन्या एक्स्प्रेस आता सुपरफास्ट झाली आहे. त्यामुळे ही गाडी प्रवाशांसाठी आरामदायी असते. मात्र २५ नोव्हेंबर रोजी देखील कोकण कन्या एक्स्प्रेसच्याच इंजिनात बिघाड झाल्याने तब्बल पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती. मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर रखडली होती. अखेर पाच तासांनी बिघाड दुरुस्त करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आले. त्यानंतर कोकणकन्या एक्सप्रेस मार्गस्थ झाली.पण यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. अशाप्रकारे सतत होणार आहे बिघाड प्रवाशांची मात्र डोकेदुखी होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami