संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

कोकणात शिक्षकांची चहापान ड्युटी रद्द

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या स्वागतासाठी, चहापानासाठी, वाहतूक व्यवस्थेसाठी लावण्यात आलेली शिक्षकांची ड्युटी रद्द करण्यात आली आहे. कोकणातील चाकरमान्यांसाठी स्वागतासाठी राजापूर तालुक्यातील 39 शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली होती. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दाखल घेऊन आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला.

कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या बाबतीत नियोजन करण्यासाठी चक्क प्राथमिक शाळेतील शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली होती. यामध्ये या चाकरमान्यांचे स्वागत करणे, त्यांच्या चहापानाची व्यवस्था करणे आणि त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करणे या गोष्टींचा समावेश होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या केवळ राजापूर तालुक्यातील 39 शिक्षकांची या कामी ड्युटी लावण्यात आली होती

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami