सांगली – कोकणचा राजा म्हणून लोकप्रिय असणाऱ्या हापूस आंब्याच्या पेट्या आज सांगलीच्या बाजारात दाखल झाल्या. यंदा आंब्याची आवक कमी असल्याने व्यापाऱ्यांना चांगला दाम मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. आजपासून आंब्याच्या हंगामाला सुरुवात झाली. पहिल्या पेट्या कुणकेश्वर देवगड या भागातून सांगलीच्या फळ बाजारात दाखल झाल्या.
गजानन फ्रुट एजन्सी समोर व्यापाऱ्यांनी आंब्याच्या पेट्यांचे पूजन करून स्वागत केले. यावेळी आलेल्या पेट्यांपैकी पहिल्या पेटीला व्यापाऱ्यांनी बोली लावली. या पेटीला ४१०० रुपये इतका उचांकी भाव मिळाला. यावर्षीच्या आंब्यांच्या आगमनानंतर आता आंब्याची आवक नियमितपणे सुरू होणार आहे. कोकणातील हापूस आंब्याला सांगली मध्ये मोठी मागणी आहे.