संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

केरळात शाकाहारी मगरीचा मृत्यू अंत्ययात्रा काढून दिला निरोप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

तिरुअनंतपुरम-जगभरातील प्राणी प्रेमींच्या काळजाला चटका लावणारी घटना केरळमध्ये घडली आहे.एका ७५ वर्षांच्या बाबिया नावाच्या शाकाहारी मगरीचे निधन झाले आहे.एका मंदिराजवळच्या तलावात तिचे वास्तव्य होते. पण तिने कधीच कुणा भाविकाला जखमी केले नाही, असे मंदिराशी संबंधित लोकं सांगतात.चक्क अंत्ययात्रा काढत या शाकाहारी मगरीला भावपूर्ण निरोप देण्यात आला.विशेष म्हणजे दिवसातून दोन वेळा ही मगर देवदर्शन करण्यासाठी मंदिर परिसरात यायची,असेही सांगण्यात आले आहे.
केरळ राज्यातील कासरगोड इथे श्री अनंदपद्मनाभ स्वामी मंदिराची रक्षक म्हणून ज्या मगरीकडे पाहिले जाते, त्या बाबिया नावाच्या मगरीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय. अनंतपुरा गावातील मंदिराच्या तलावात बाबिया मगरीचा मृतदेह आढळला. मागच्या रविवारी तिचा मृत्यू झाला.गेल्या काही दिवसांपासून बाबिया मगरीची प्रकृती खालावली होती.तिने खाणेपिणे सोडले होते, असे मंदिराचे ट्रस्टी उदय कुमार आर गट्टी यांनी सांगितले. मंगळुरु येथील पिलुकुला बायोलॉजिकल पार्कातील पशु चिकित्सकांनी या मगरीच्या मृत्यूबाबत तपास सुरु केला आहे,असे सांगितले जात आहे.दिवसातून दोन वेळा बाबिया मगर देवदर्शनसाठी यायची.मंदिर प्रशासनाकडून या मगरीला दिवसातून दोन वेळा प्रसाद दिला जात होता.या प्रसादाचे सेवन ही मगर करत असे.तांदूळ, गूळ खाणारी ही मगर आता जिवंत नसल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.
मंदिरात दाखवला जाणारा तांदळाच्या लाडवाचा प्रवास बाबिया मगरीला दिला जात होता.दरम्यान,तिला अनेकदा मांसही खाण्यासाठी दिले गेले होते.पण तिने ते खाल्ले नाही, असे सांगितले जाते. ना तिने कधी माणसांवर हल्ला आणि नाही तिने कधी तलावातील माशांचे सेवन केले, असेही मंदिरातील लोकं सांगतात.बाबिया मगरीला ईश्वरदूत मानले जात होते. तिने कधीच कुणावरही हल्ला केला नव्हता.तिच्यावर परंपरेप्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आलेअंत्ययात्रा काढून मंदिर परिसरातच या मगरीला दफन करण्यात आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami