संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

केरळमध्ये राहुल गांधींचा नवा अंदाज थरारक ‘ साप बोट ” शर्यतीत सहभाग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

थिरूवअनंतपुरम – काँग्रेसचे नेते अध्यक्ष राहुल गांधींनी राजकारणात पुन्हा एकदा कंबर कसली आहे.त्यासाठी त्यांनी ‘भारत जोडो यात्रा ” सुरू केली आहे.या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात ते केरळात आहेत. तेथे ते लोकांना जावून भेटत आहे, ज्याचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, त्यामध्ये राहुल गांधींनी चक्क स्नेक बोट रेसमध्ये म्हणजेच साप बोट शर्यतीत सहभाग घेत ही बोट चालवली आहे.
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी काही ना काही कारणाने सतत चर्चेत राहत आहेत.आधी त्यांच्या हजारो रुपये किंमतीचा पांढरा टी शर्टवरुन वाद उद्धभवला. नंतर प्रत्येकाला भेटतानाचे त्यांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले. एका मुलीसोबतचा त्यांचा एक अप्रतीम फोटोही व्हायरल झाला. अगदी घराघरापर्यंत जाऊन ते लोकांना भेटत आहे, त्यावर कधी टीका होते, तर कधी कौतूक होत आहे.तर या भारत जोडो यात्रेच्या १२ व्या दिवशी केरळच्या पुननमदा तलावात राहुल गांधी आपल्या स्नेक बोटसह उतरले, त्यांच्या हाती चप्पू होता, आणि अगदी सहजपणे ते ही बोट हाकत होते. स्नेक बोटची शर्यत हा केरळमधला पारंपरिक खेळ आहे,ज्याला याठिकाणी खूप मानाचे स्थान आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी केरळच्या पुननमदा तलावात साप बोट शर्यतीच्या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.
यावेळी अशा ३ स्नेक बोटींमध्ये शर्यत लावण्यात आली होती.एका बोटीवर किमान १०० लोक दोन्ही बाजूने बसलेले असतील. प्रत्येकाच्या हाती चप्पू होता.
राहुल गांधी या बोटीच्या मधोमध बसलेले होते.अंगात तोच पांढरा टी शर्ट आणि साधी पॅट, एक पाय बोटीच्या किनाऱ्यावर तर एक बोटीत आणि हाती चप्पू,अगदी सर्वांसोबत एका लईत राहुल गांधी यांनी बोट चालवली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा तोच तलाव आहे, जेथे दरवर्षी बोटींच्या स्पर्धा होत असतात. आणि यावर मोठी बक्षीसही असतात. यानिमित्ताने केरळचा हा पारंपरिक खेळ अनुभवण्याची संधी राहुल गांधींना मिळाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami