संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 22 March 2023

केरळच्या इरिंजादापल्ली मंदिरात रोबोटिक हत्ती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

तिरुअंनतपुरम – केरळच्या त्रिशूर येथील इरिंजादापल्ली श्रीकृष्ण मंदिर परिसरात 11 फूट आणि 800 किलो वजनाचा लोखंडी फ्रेमने बनवलेला रोबोटिक हत्ती बनवण्यात आला आहे. या हत्तीला बाहेरून रबर कोटिंग करण्यात आले आहे. ‘रमन` असे या रोबोटिक हत्तीचे नाव आहे. या मंदिराला नादायिरुथल या धार्मिक विधीदरम्यान हत्ती भेट देण्यात आला.
दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री पार्वती थिरुवोथू यांनी प्राण्यांच्या हक्कांवर काम करणाऱ्या पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (पेटा इंडिया) च्या सहकार्याने रोबोटिक हत्ती बनवला असून हा रोबोटिक हत्ती तयार करण्यास 5 लाखांचा खर्च आला. मंदिराचे पुजारी राजकुमार नंबूदिरी म्हणाले की, रोबोटिक हत्ती मिळाल्याने मंदिर समितीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्हाला आशा आहे की हत्तींच्या पूजेसाठी इतर मंदिरांमध्ये रोबोटिक हत्तींचा वापर केला जाईल. आत्तापर्यंत पूजेसाठी खरा हत्ती भाड्याने घ्यायचा खूप खर्च व्हायचा. अलीकडे हत्ती हिंसक होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे मंदिराने ही प्रथा बंद केली होती.
दरम्यान, रोबोटिक हत्तीचे डोके, कान आणि शेपूट हे सर्व विजेच्या सहाय्याने फिरतात. त्याच्या पाठीवर खऱ्या हत्तींप्रमाणे पाच लोक बसू शकतात. त्याचा उपयोग मिरवणुकीत करता येऊ शकतो. हा हत्ती शेपटीवर बनवलेल्या स्विचने चालवण्यास सक्षम असेल. दुबई शॉपिंग फेस्टिव्हलसाठी हत्तीची शिल्पे बनवणाऱ्या त्रिशूर येथील कलाकारांच्या एका गटाने हत्ती तयार केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या