संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

केमोथेरपीचे दुष्परिणाम कमी होणार! गुवाहाटी आयआयटीने केले संशोधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

गुवाहाटी- केमोथेरपी ही दुष्परिणामांसाठी कुप्रसिद्ध आहे.या वैद्यकीय पद्धतीत कर्करोग रुग्णाची केस गळती आणि भूक कमी होत असते.केमोथेरपीचे हे दुष्परिणाम कमी करणारी केमो स्ट्रॅटेजी म्हणजेच केमो रणनीती गुवाहाटीआय आयआयटीने नवी पद्धती विकसित केली आहे.या पद्धतीत केमोथेरपीचे औषध हे रक्तात न टाकता कर्करोग रुग्णाच्या थेट बाधित पेशीत टाकले जाते.त्यामुळे या औषधाचे दुष्परिणाम होत नाहीत,अशी माहिती गुवाहाटी आयआयआयटीच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रा.देबाशिष मन्ना यांनी दिली आहे.

गुवाहाटी आयआयटीच्या या संशोधनात प्रा.देबाशिष मन्ना यांच्यासह अंजली पटेल, सुभाशिष डे, विश्व मोहन प्रूस्टी आदी संशोधकांनी सहभाग घेतला होता.
याबाबत अधिक माहिती देताना प्रा. मन्ना यांनी सांगितले की,केवळ कर्करोगग्रस्त पेशींना नष्ट करणारे औषध निर्माण करणे हे आमच्यासाठी मोठे आव्हान होते.कारण केमोथेरपी म्हटले की कर्करोगाच्या पेशीसोबत चांगल्या पेशींनाही इजा पोहचणे आलेच.अशा दुष्परिणामामुळे काहीवेळा रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते.पण आम्ही हे केमोचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी विशेष रेणू विकसित केले आहेत.हे विशेष रेणू औषधासोबत कॅप्सूलमध्ये साचवले जातात.ही कॅप्सूल फक्त कर्करोगग्रस्त पेशींवरच करते.या नवीन औषधामुळे केमोथेरपीचे दुष्परिणाम कमी होतात.हे विशेष संशोधन ‘ द रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री,केमिकल कम्युनिकेशन,ऑरगॅनिक अँड बायोमॉलीकेमिस्ट्री आदी विख्यात जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. आपल्या भारतामध्ये २०२५ पर्यंत ३ कोटीहून अधिक रुग्ण सापडण्याची शक्यता आयआयटी गुवाहाटीच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami