रुद्रप्रयाग : आज शिवरात्रीच्या निमित्ताने उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली. केदारनाथ मंदिराचे दरवाजे २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ६:२० वाजता उघडतील. २२ एप्रिलपासून चारधाम यात्रा सुरू होणार आहे. दुसरीकडे, उत्तराखंडच्या चार धाममधील गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे २२ एप्रिलला आणि बद्रीनाथचे दरवाजे २७ एप्रिलला उघडले जाणार आहेत.
केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर झाल्यानंतर आता यात्रेच्या तयारीला वेग येणार आहे. परंपरेनुसार, दरवर्षी शिवरात्री उत्सवात केदारनाथ मंदिराचे द्वार उघडण्याची तारीख पंचकेदार गद्दीस्थल ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ येथे निश्चित केली जाते. २२ एप्रिल रोजी ओंकारेश्वर मंदिरातून हिवाळी आसनस्थ डोलीचे प्रस्थान होईल आणि रात्रीच्या विश्रांतीसाठी २३ तारखेला गुप्तकाशी, फाटा, गौरीकुंड आणि २४ रोजी गौरी कुंड केदारनाथ धाम येथे पोहचले. त्यांनतर २५ एप्रिल केदारनाथचे दरवाजे उघडले जातील.