संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचे धोकादायक लँडिंग! डीजीसीएच्या मार्गदर्शक सूचना

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : चार धाम यात्रेसाठी यात्रेकरूंना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर नियंत्रण सुटल्याने जमिनीवर कोसळण्यापासून थोडक्यात बचावले. खराब हवामानामध्ये केदारनाथ मंदिराच्या हेलिपॅडवर खासगी हेलिकॉप्टर उतरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, या घटनेनंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने चार धाम मार्गावर कार्यरत सर्व हेलिकॉप्टर ऑपरेटरना सर्व सुरक्षा मानकांचे काटेकोरपणे पालन करण्याचा इशारा दिला आहे. डीजीसीएने म्हटले आहे की ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत, जर निष्काळजीपणा आढळला तर हेलिकॉप्टर ऑपरेटर कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, केद्रानाथचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडियो ३१ मे चा असून, हेलिपॅडवर प्रवासी हेलिकॉप्टर उतरणार होते, मात्र काही कारणांमुळे ते हेलिकॉप्टर थेट जमिनीवर आदळताना दिसत आहे. त्यावेळी तेथे अनेक लोक उपस्थित होते. हेलिकॉप्टर जमिनीवर आदळताच लोक घाबरले. मात्र हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले गेले असून डीजीसीएकडून चौकशी केली जात आहे. या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करत डीजीसीएने वैमानिकांना चार उंच मंदिरांवर, विशेषत: केदारनाथमध्ये, जेथे दृश्यमानतेची समस्या आहे तेथे उड्डाण करताना आणि उतरताना जोरदार वाऱ्यापासून सावध राहण्यास सांगितले आहे. जर वारा जास्त असेल तर उतरण्याचा किंवा उड्डाण करण्याचा प्रयत्न करू नका.डीजीसीएने मार्गदर्शक सूचनांमध्ये असेही म्हटले आहे की केदारनाथ खोऱ्यात जाणाऱ्या सर्व हेलिकॉप्टरने पुरेसे अंतर राखले पाहिजे. याशिवाय, हेलिकॉप्टर ऑपरेटर कंपनीला हे तपासून घ्यावं लागेल की वैमानिक अशा वातावरणात हेलिकॉप्टर चालविण्यास सक्षम आहे. याशिवाय ऑपरेटर कंपनी वैमानिकांना आराम मिळतो आहे का हे ही तपासून घेईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami