संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

केकेच्या ओठांवर, चेहऱ्यावर जखमा; कोलकात्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोलकाता – प्रसिद्ध गायक कृष्ण कुमार कुन्नथ उर्फ केके याचे मंगळवारी निधन झाले. केकेचा कोलकात्यात एक कॉन्सर्ट सुरू होता. त्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला, असे वृत्त आहे. मात्र कोलकात्याच्या न्यू मार्केट पोलीस ठाण्यात त्यांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केकेच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जखमा झाल्या होत्या. त्यामुळे आता केकेचा मृत्यू शारिरीक आजाराने झाला की अन्य कारणाने झाला याचा तपास पोलीस करत आहेत. टेल स्टाफ आणि कार्यक्रम आयोजकांची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, काल रात्री केकेच्या मृत्यूची बातमी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला. वयाच्या ५३व्या वर्षी केकेने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. केकेने ए.आर. रेहमानचे सुपरहिट गाणे कल्लुरी साले आणि हॅलो डॉक्टरच्या माध्यमातून आपल्या करियरची सुरुवात केली होती. तर, गुलझार यांच्या माचिस या चित्रपटातील ‘छोड आये हम’ या गाण्यातला छोटा भाग गाऊन त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. १९९९ सालच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातल्या ‘तडप तडप के’ या गाण्यानंतर त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami