ओटावा – कॅनडा सरकारने शॉर्ट फॉर्म व्हिडीओ अॅप टिकटॉक वर प्रतिबंध घातले आहेत.कॅनडा सरकारकडून हा निर्णय सायबर सुरक्षेच्या कारणावरून घेतला आहे. सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार,आज मंगळवार २८ फेब्रुवारी पासून सरकारी मोबाईल फोनमध्ये टिकटॉक वापरण्यास बंदी असेल. हे अॅप हटवले जात आहे. भविष्यात या अॅपच्या डाऊनलोड्स वर देखील बंदी येऊ शकते.
अमेरिकेपाठोपाठ आता कॅनडामध्येही डेटा संबंधी चिंता व्यक्त करत टिकटॉक या चीनी अॅपला रोखण्यात आले आहे.कॅनडा सचिवालयाच्या ट्रेजरी बोर्डने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,सरकारद्वारा जारी करण्यात आलेल्या उपकरणांमध्ये टिकटॉक डाऊनलोड करण्यास प्रतिबंध असेल. सध्या इंस्टॉल असलेल्या अॅपला देखील हटवण्यात आले आहे.टिकटॉक गोपनियता आणि सुरक्षा याबाबतीत विश्वासार्ह नाही.कॅनडाच्या या निर्णयामुळे मात्र चीनसोबतच्या संबंधांमध्ये या दोन्ही देशात दुरावा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.