संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

कॅडबरीच्या मालकांनी यूएस एनर्जी बार मेकर ‘क्लिफ’ खरेदी केली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन – ब्रिटीश चॉकलेट ब्रँड कॅडबरीच्या मालकांनी यूएस एनर्जी बार निर्माता क्लिफ बार अँड कंपनी २.९ अब्ज डॉलर्सना विकत घेण्याची घोषणा सोमवारी केली. ‘मॉंडेलेझ इंटरनॅशनल’कडे ओरियो, टोब्लेरोन आणि मिल्कादेखील आहेत. त्यांनी म्हटले की, हा करार स्नॅकिंग क्षेत्रात भविष्यात नेतृत्त्व करणारा ठरेल. महत्त्वाचे म्हणजे क्लिफ जवळपास ३० वर्षांपासून कार्यरत आहे. तर, क्लिफ बारचे संपादन हा मॉंडेलेझचा २०१८ पासूनचा नववा करार आहे.

सोमवारी एका निवेदनात मॉंडेलेझने म्हटले की, ‘या खरेदीमुळे त्यांच्या स्नॅक बार व्यवसायाचे मूल्य १ अब्ज डॉलर्सनी वाढेल. या वर्षाच्या शेवटी व्यवहार पूर्ण झाल्यावर कॅलिफोर्नियातील एमरीव्हिल येथून क्लिफचा व्यवसाय सुरू होईल, जिथे फर्मचे मुख्यालय आहे’, असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच मॉंडेलेझचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डर्क व्हॅन डी पुट म्हणाले, ‘क्लिफ बार अँड कंपनीचे आणि त्यांच्या कर्मचार्‍यांचे मॉंडेलेझ आंतरराष्ट्रीय कुटुंबात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे.’

दरम्यान, अनेक प्रतिस्पर्ध्यांप्रमाणेच आपल्यालाही वाढत्या महागाईचा सामना करावा लागत असल्याचे कंपनीने म्हटले होते. त्यामुळे येत्या काळात कॅडबरी डेअरी मिल्क शेअरिंग बारचा आकार १० टक्क्यांनी कमी करणार, असे मार्च महिन्यात जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार ग्राहकांसाठी किंमत कमी न करता बारचा आकार आता २०० ग्रॅमवरून १८० ग्रॅमपर्यंत कमी करण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami