संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

कृष्णा नदीवरील ऐतिहासिक बंधारा वाचवण्यासाठी सांगलीकर एकवटले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सांगली – सांगलीतील कृष्णा नदीवरील ८९ वर्षाचा ऐतिहासिक बंधारा पाटबंधारे विभागाच्यावतीने पाडण्यात येत असल्याचा दावा करत पैलवान पृथ्वीराज पवार यांनी सर्व सांगलीकरांनी एकत्र या आणि चला बंधारा वाचवू या असे म्हणत आज रविवारी सकाळी सांगलीच्या कृष्णा नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर मानवी साखळी करून शासनाच्या निर्णयाला विरोध केला आहे.

आज जागतीक पर्यावरण दिनादिवशी सांगली अमरधाम शेजारी बंधाऱ्याजवळ जागृत सांगलीकर नागरीक यांनी एकत्र येवून प्रतिकात्मक मानवी साखळी बनवून बंधारा वाचविण्याचा संदेश दिला आहे.सांगलीच्या कृष्णा नदीवर सन १९३३ कालावधीत बांधण्यात आलेला बंधा-यास आज ८९ वर्षे पूर्ण झाले आहेत. सांगली आणि परिसरातील सुमारे नऊ लाख नागिरक आणि असंख्य जनावरे आणि वृक्षवल्लींची हा बंधारा तहान भागवतो. या बंधाऱ्यात आडवल्या जाणाऱ्या पाणी साठ्यातून सांगली, कुपवाड, पद्माळे, कर्नाळ, माधवनगर, कवलापूर, बुधगांव, सांगलीवाडी यासह काही गावात पिण्यासाठी व सिंचनासाठी दररोज लाखो लिटर पाणी उपसा केले जाते.सांगलीचा बंधारा पाडून जर म्हैसाळमध्ये पाणी अडवले तर हरिपूरच्या संगमापासून मौजे डिग्रजच्या बंधाऱ्यापर्यंत पाण्याचा एक मोठा डोह तयार होणार आहे. या डोहात शहारातील चार नाल्यामधून रोज अंदाजे १५ ते २० लाख लिटरपेक्षाही जास्त सांडपाणी गटार मिसळणार आहे.

औद्योगिक वसाहतीतून येणारे रासायनिक पाणी व शहराच्या सांडपाण्यामुळे शहराची घाण पुन्हा नऊ लाख लोकांच्या नळामधून घरपोच होऊ शकते.हरिपूर संगमापासून डिग्रजच्या बंधा-यापर्यंत मगरीचा मुक्त वावर असणारी वसाहत होऊन नदीकाठचे शेतकरी , जनावरे , रहिवाशी व जलतरणास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच सांगली, कोल्हापूर नदीकाठचे सुमारे चार हजार एकर जमीन कायमची बाधीत होऊन शेतकऱ्यांचे व रहिवाश्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो. त्यामुळे याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami