संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 01 February 2023

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील
भुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील भुयारीकरणाचं काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील अपलाईन मार्गावरील या भुयारीकरणास एकूण ४३ दिवसांचा कालावधी लागला.
मेट्रो-३ मार्गातील सर्वात लांब पट्ट्यांपैकी एक असलेल्या पॅकेज-३ मध्ये मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. पॅकेज-३ अंतर्गत महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतची ८३७ मीटरची सर्वात आव्हानात्मक भुयारीकरणाचे काम रॉबिन्सच्या टीबीएम तानसा-१ ने यशस्वीरित्या पूर्ण केले.
दरम्यान, मेट्रो-३ च्या भुयारी मार्गाचे काम १००% पूर्ण झाले या क्षणाचे साक्षीदार झाला आनंद असल्याचे मत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले. तसेच हा मार्ग म्हणजे, मुंबईच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती, जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती, सध्याचा मेट्रो मार्ग, रेल्वे मार्ग, नदी व कठीण भौगोलिक रचना असलेला परिसर आदींच्या खालून व अगदी जवळून जात असल्याने मेट्रो-३ साठी भुयारीकरण करणे खूपच आव्हानात्मक असल्याचेही अश्विनी भिडे यांनी सांगितले. त्याचबरोअबर मेट्रो-३ हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव नक्कीच मिळेल”,असा विश्वास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक प्रकल्प एस.के. गुप्ता यांनी व्यक्त केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami