संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

कुलगाम चकमकीत अतिरेकी ठार! २ नागरिक आणि १ जवान जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेकी यांच्यात चकमक झाली. त्यात जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा १ अतिरेकी ठार झाला. चकमकीत २ नागरिक आणि १ जवान असे ३ जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली.

काश्मीर खोऱ्यातील कुलगाम जिल्ह्याच्या बटपोरा भागात अतिरेकी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या भागाला घेराव घालून शोध मोहीम हाती घेतली. त्यावेळी अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा एक अतिरेकी ठार झाला. यात २ नागरिक आणि एक जवान असे ३ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami