संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

कुर्ल्यातील गुलाब शहा गोदामांमध्ये भीषण आग ! कोट्यवधींचे नुकसान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईतील कुर्ला परिसरात आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास गोदामांमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. कुर्ल्यातील गुलाब शहा इस्टेट येथील गोदामांमध्ये ही भीषण आग लागली होती.या आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे १० ते १५ बंब घटनास्थळी दाखल झाले होते.मागील ४ तासंपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. अखेर ही आग आटोक्यात आली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कोट्यवधींचे साहित्य जळून खाक झाले आहेत.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही आग रात्री साडेतीनच्या सुमारास लागली होती.एलबीएस कुर्ला पश्चिम येथे रस्त्यावर या परिसरात अनेक कपडे, कम्प्युटर पार्ट, प्लास्टिक साहित्य, भंगार साहित्य अशी गोदामे अनेक आहेत. त्यामुळे ही आग वाढतच गेली. यावेळी संपूर्ण परिसर धुराने भरला होता. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला अथक प्रयत्न करावे लागले,त्यानंतर ही आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणीतही जीवितहानी झाल्याचे अद्यापतरी समोर आलेले नाही. मात्र, या आगीत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami