संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

कुपवाड्यात चकमक; दोन दहशतवादी ठार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये कांडी भागात आज पहाटे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्र कांडी येथे दहशतवादी लपल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. पोलिसांचा वेढा पाहून भेदरलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख उत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार केले. यापैकी एकाचे नाव तुफैल असे असून तो पाकिस्तानचा रहिवासी होता.

दरम्यान, याआधी सोमवारी संध्याकाळी उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केले होते. त्याच्याकडून एक एके 47 रायफल, पाच मॅगझिन आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली. त्याच्याकडे मिळालेल्या कागदपत्रांनुसार त्याची ओळख हंजला असून तो पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी होता. तर, यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोन पाकिस्तानी आणि एक स्थानिक दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami