संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 01 February 2023

कुख्यात गुंड गजानन मारणेची
12 दिवसांच्या कोठडीत रवानगी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणे अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरेंना वाई येथील फार्म हाऊसवर भेटण्यासाठी गेला होता. यावेळी पुणे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आज त्याला व त्याच्या साथिदाराला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता कोर्टाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गज्या मारणेला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांची अनेक पथके रवाना झाली होती. अशातच मारणे हा वाई येथे ठोंबरे यांच्या फार्म हाऊसवर भेटण्यासाठी आल्यानंतर ठोंबरे यांनी पोलिसांना कल्पना देवून मारणेला हजर होण्याचा सल्ला दिला. यावेळी गजानन मारणे पोलिसांना शरण गेल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुण्याच्या दिशेने कूच केली. काही दिवसांपूर्वी 33 वर्षीय व्यावसायिकाने पुणे पोलिसांत तक्रार दिली होती. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची शेअर मार्केट व्यवहाराची कंपनी आहे. या कंपनीत हेमंत पाटील यांनी चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तक्रारदार यांची कंपनी डबघाईला आल्याने परतावा देता आला नाही. पाटील याने वारंवार चार कोटींच्या बदल्यात 20 कोटींची मागणी केली. थोड्या दिवसात चार कोटी रुपये देतो किंवा जमीन नावे करून देतो, असे तक्रारदाराने सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami