संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 05 February 2023

किलोमीटर सक्तीमुळे प्रवाशी नसतानाही रिकामी एसटी चालविण्याची धडपड सुरू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर- एसटी महामंडळाने चालक-वाहकांना किलोमीटरची सक्ती केली असल्याने आता प्रवासी मिळत नसलेल्या मार्गावरही एसटी चालविण्याची धडपड करावी लागत आहे.मात्र यामुळे एसटीला मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
मुळात आगारातूनच चालकांना एसटी ताब्यात मिळत नाही.त्यामुळे अर्धे अधिक ताठकळत बसलेले प्रवाशी बस वेळेवर न आल्याने खासगी गाड्यांचा पर्याय निवडताना दिसतात.मात्र उशिरा हातात मिळालेली एसटी किलोमीटरची सक्ती असल्याने फेऱ्या पूर्ण करण्यासाठी अनेकदा रिकामीच आगारातून बाहेर काढावी लागत आहे.त्यानंतर पुढेही बसथांब्यावर म्हणावे तितके प्रवाशी मिळत नाहीत,पण किलोमीटरची सक्ती असल्याने त्या फेऱ्या पूर्ण कराव्याच लागत असल्याचे चालक-वाहक सांगत आहेत.दुसरीकडे नागपूर प्रभारी विभाग नियंत्रक किशोर आदमने यांनी म्हटले आहेकी,प्रवासी मिळाले नाही तरी एसटीच्या फेऱ्या पूर्ण कराव्या लागत आहेत हे जरी खरे असले तरी चालक-वाहकांना अशी किलोमीटरची सक्ती नाही.दरम्यान,साधारण एसटीला एका किलोमीटरमागे ५२ रुपये खर्च येतो.त्यातच चालक-वाहक पगार,डिझेल खर्च आणि अन्य खर्च आहे.वास्तविक २००८ मध्ये कामगार संघ्त्नेसोबात्झालेल्या बैठकीत महामंडळ प्रशासनाने किलोमीटरची सक्ती केली जाणार नसल्याबाबतचे निर्देश दिले होते.मात्र प्रत्यक्षात तसे न होता सक्ती सुरूच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उत्पन्न नसताना एसटीला लागणारा खर्च करावाच लागत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami