संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 29 March 2023

किरीट सोमय्यांविरोधात तक्रार करणारा तक्रारदार गायब

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बदलापूर- भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी बदलापूर पूर्व पोलिसांकडे मागणी केले आहे की, माझ्या आणि माझ्या परिवाराविरोधात तक्रार करणारे तक्रारदार पंढरीनाथ साबळे हे गायब झाले असून त्यांचा मनसुख हिरेन होण्याची भीती आहे.साबळे यांनी त्यांचा बदलापूरमधील जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर साबळे राहतच नसून, त्यामुळे साबळे यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर शोधून काढावे.

भाजप नेते किरीट सोमैय्या आणि त्यांच्या परिवाराने आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार बदलापूरमधील पंढरीनाथ साबळे यांनी मुंबई पोलिसांकडे केली होती. 23 फेब्रुवारी 2022 रोजी करण्यात आलेल्या या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने या तक्रारीची चौकशी केली होती. त्यानंतर या प्रकरणात सोमैय्या परिवाराविरोधात कोणताही गुन्हा दाखल होत नसल्याचं सांगत ती चौकशी बंद केली होती. त्यानंतर 3 ऑक्टोबर 2022 रोजी याबाबतचा क्लोजर दिलेला त्यांचा बदलापूरमधील पत्ता चुकीचा आहे. त्या पत्त्यावर ते स्वतः राहातच नसल्याचे किरीट सोमैय्या यांच्या निदर्शनास आले. सदर पत्त्यावरील घर हे दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने असून तिथे अरविंद जगताप नावाची व्यक्ती वास्तव्याला असल्याची बाब किरीट सोमैय्या यांनी समोर आणली. तर तक्रारदार पंढरीनाथ साबळे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते देखील सापडू शकले नाहीत. त्यामुळे ठाकरे सरकारने माझ्या परिवाराविरोधात तक्रार करण्यासाठी पंढरीनाथ साबळे याचा वापर करून घेतला आणि नंतर त्याचा मनसुख हिरेन करण्यात आला, अशी भीती किरीट सोमैय्या यांनी व्यक्त केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या