लंडन: ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. राणीनंतर आता त्यांचा मुलगा चार्ल्स ब्रिटनचा राजा आहे. ब्रिटनच्या रॉयल मेल पोस्टलकडून बुधवारी राजा चार्ल्स तिसरा यांची प्रतिमा असलेल्या टपाल तिकिटांचे अनावरण करण्यात आले आहे.
ज्यामध्ये फक्त सम्राटाचा चेहरा, स्टॅम्प व्हॅल्यू आणि बारकोड दिसत आहे. जे ४ एप्रिलपासून सर्वसाधारण विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र सध्या किरकोळ विक्रेत्यांकडून दिवंगत राणी एलीझाबेथचे स्टॅम्प विकणे सुरू राहणार आहे आणि हा स्टॉक संपल्यावर नवीन राजा चार्ल्स यांचे स्टॅम्प बाजरात आणले जातील अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. ब्रिटिश कलाकार अरनॉल्ड माचिन यांच्याकडून १९६० च्या दशकात राणीची प्रतिमा असलेले टपाल तिकीट तयार केले गेले होते. जे जगभरातील युके चे प्रतिकात्मक प्रतीक होते. तर आता इथे विराजमान असणारे चार्ल्स यांची प्रतिमा ब्रिटीश शिल्पकार मार्टिन जेनिंग्स यांच्याकडून तयार करण्यात आले आहे. ब्रिटिश स्टॅम्पवर देश नाही तर राजाची प्रतिमा असल्यामुळे हे स्टॅम्प विशष असल्याचे रॉयल मेलचे चीफ एक्झिक्युटिव्ह सायमन थॉम्पसन यांनी सांगितले.