पिंपरी – पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी भागात असलेल्या जुन्या टायरच्या गोडाऊनला सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास मोठी आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
रात्रीची वेळ असल्याने टायरच्या गोडाऊन मध्ये कोण नसल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आग ज्या ठिकाणी लागली त्याच ठिकाणी बाजूला खाजगी रुग्णालय असल्याने सुरक्षितेचा उपाय म्हणून सर्व रुग्णांना विविध रुग्णालयात हलवण्यात आले. चार तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळण्यात अग्निशमन दलाला यश आले.