नवी दिल्ली – देशात थंडीचा मौसम सुरु झाला असून काश्मीर आणि हिमाचलसह उंच भागात बर्फवृष्टी सुरु झाली आहे. त्यामुळे काश्मीर-हिमाचलमध्ये पारा शून्याच्या खाली पोहोचला आहे. त्यामुळे मैदानी भागातही तापमानात घट झाली आहे. दिल्लीत मात्र अजूनही कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. त्याचवेळी मुंबईत ढगाळ वातावरण आहे. मैदानी भागांमधेही थंडीची सुरवात झाली आहे. राजस्थानच्या चुरूमध्ये किमान तापमान 5 अंशांवर पोहोचले. त्याचबरोबर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्येही पारा घसरला आहे. मंडस चक्रीवादळानंतर दक्षिणेकडील राज्यांमध्येही हवामान बदलले आहे. कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.