संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

काश्मीरी पंडितांवर हल्ल्यावरुन पुण्यात शिवसेनेचे आंदोलन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- जम्मू-काश्मीर येथील पंडितांवर हल्ले होत असल्याने पुण्यातील गुडलक चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणा दिल्या. काश्मिरी पंडितांना संरक्षण देण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील यावेळी शिवसैनिकांकडून करण्यात आली.
शिवसेना पुणे शहरप्रमुख म्हणाले, केंद्रातील सत्तेला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाकडून विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहे. मात्र दुसरीकडे जम्मू-काश्मीर येथील पंडितांवर पुन्हा एकदा हल्ले सुरू झाले. या हल्ल्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला. ही बाब निषेधार्ह असून या घटना रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. तेथील नागरिकांना संरक्षण द्यायचे सोडून केंद्र सरकार केवळ वाचळ वीरांना संरक्षण देत बसले असल्याचे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami