संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

काश्मीरमधील किराणा मालाच्या दुकानात बिअर उपलब्ध होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर: जम्मू-कश्मीरमध्ये अधिकृत किराणा दुकानांमध्ये बिअर उपलब्ध होणार आहे. काश्मीरच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी सोमवारी याबाबतच्या अर्जाला मान्यता दिली आहे.

आता जम्मू-कश्मीरच्या शहरी भागातील अधिकृत डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये बिअर आणि इतर रेडी टू ड्रिंक प्रकारातील शितपेये उपलब्ध होणार आहेत. मात्र, अशा प्रकारच्या स्टोअर्ससाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. जम्मू आणि श्रीनगरसाठी एखाद्या व्यावसायिक संकुलातील १२०० चौरस फूट जागेचा गाळा, वार्षिक पाच कोटी उत्पन्न अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत. तर इतर शहरी भागासाठी २ कोटी इतकी अट ठेवण्यात आली आहे. ज्या डिपार्टमेंटल स्टोअरचं वार्षिक उत्पन्न १० कोटींच्या वर असेल, त्या दुकानांना स्वतंत्र मद्य परवान्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी त्या स्टोअरने अर्जापूर्वी किमान वर्षभर आधीपासून सुरू असणे बंधनकारक आहे. त्याखेरीज संबंधित डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये धान्य, गोठवलेले अन्नपदार्थ, बेकरी उत्पादने, प्रसाधने, सौंदर्य उत्पादने, गृहोपयोगी वस्तू, स्वयंपाकघरातील वस्तू, खेळाचे सामान, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, स्टेशनरीचे साहित्य इत्यादी सामग्रींपैकी किमान सहा प्रकार उपलब्ध असणे बंधनकारक आहे. पेट्रोल पंपावरील डिपार्टमेंटल स्टोअर्सना मात्र मद्य परवान्यासाठी ग्राह्य धरले जाणार नसल्याचेही सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami