संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

काश्मिरी पंडितांच्या दुकानांना मिळणार मोफत वीज कनेक्शन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – दिल्लीतील काश्मिरी पंडितांसाठी केजरीवाल सरकारने मोठी घोषणा केली आहे. दिल्लीचे अरविंद केजरीवाल सरकार लवकरच आयएनए मार्केटमधील विस्थापित काश्मिरी पंडितांच्या दुकानांना मोफत वीज जोडणी देणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मोफत वीज कनेक्शनसाठी बीएसईएस आणि पीडब्ल्यूडीसह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष आणि ग्रेटर कैलाशचे आमदार सौरभ भारद्वाज हे उपस्थित होते.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी तातडीने विभागाची पाहणी करून महिनाभरात सर्व दुकानांमध्ये वीज जोडणी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. अलीकडेच काश्मिरी पंडितांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन वीज कनेक्शनचा मुद्दा मांडला होता. यादरम्यान, काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितले की, या भागातील विविध बांधकामांमुळे मार्केटमधील १००हून अधिक दुकाने अलिकडच्या काळात वारंवार विस्थापित झाली आहेत. आयएनए मार्केटमध्ये काश्मिरी पंडितांची १०० हून अधिक दुकाने आहेत. मात्र तिथे कायमस्वरूपी वीज व्यवस्था नाही. या बैठकीनंतरच सीएम केजरीवाल यांनी या प्रकरणाची दखल घेत अधिकाऱ्यांना यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले, काश्मिरी पंडितांच्या प्रश्नांवर राजकारण करण्याऐवजी केजरीवाल सरकार दिल्लीत त्यांच्या उन्नतीसाठी काम करण्यास कटिबद्ध आहे. दिल्ली सरकार नेहमीच काश्मिरी पंडितांच्या हितासाठी उभे आहे, आयएनए येथे असलेल्या काश्मिरी पंडितांच्या दुकानांमध्ये वीज कनेक्शन लावण्याचे काम सुरू करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. दुकानदारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि संपूर्ण खर्च दिल्ली सरकारकडूनच उचलला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami