संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

काशी विश्वनाथ मंदिराच्या बाहेरील
भिंतींनाही चढवला सोन्याचा मुलामा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वाराणसी – यावर्षी मार्च महिन्यात काशी विश्वनाथ मंदिराला एका भक्ताने तब्बल ६० किलो सोने दान केले होते.त्यातील ३७ किलो सोने गर्भगृहाच्या आतील भिंतींवर आणि चार दरवाजांना वापरण्यात आले आहे.तर आता २३ किलो सोने मंदिराच्या बाहेरील भिंतींना लावण्यात आले आहे.
काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनापूर्वी हे सोने दान देणारा एक भाविक मंदिर प्रशासनाच्या संपर्कात आला होता. मात्र, त्या भाविकाने आपले नाव सांगण्यास नकार दिला होता.त्याने दिलेल्या सोन्याचा वापर आता मंदिराच्या अशा भागासाठी करण्यात आला आहे.दिल्लीच्या कारागीरांनी केले काममंडल अधिकारी दीपक अग्रवाल यांनी सांगितले की, ‘हे काम पूर्ण करण्यासाठी दिल्लीतील एक कंपनीला काम दिले होते. या कंपनीच्या कारागिरांनी गर्भगृहाच्या कलात्मक भिंती ताम्रपटांच्या साहाय्याने बनवल्या.भिंती तयार झाल्यानंतर लावल्यानंतर त्यावर या भाविकाने दान केलेल्या सोन्याचा मुलामा चढवण्याची प्रक्रिया करण्यात आली.सध्या गर्भगृहामध्ये जमिनीपासून आठ फुट उंचीपर्यंत काम केले आहे. वरपासून दाराच्या चौकटी पर्यंत सोन्याचे काम झाले आहे. गर्भगृहाच्या या सोन्याच्या भिंती आता पारदर्शक फायबरने झाकल्या आहेत. जेणेकरून त्यांचे धूर आणि धुळी पासून संरक्षण होईल.
१८ व्या शतकानंतर सर्वात मोठे हे काम आहे. १८ व्या शतकानंतर मंदिराच्या कोणत्याही भागावर सोन्याचा मुलामा चढवण्याचे हे दुसरे सर्वात मोठे काम आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या इतिहासानुसार, १७८० मध्ये इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराची पुनर्बांधणी केल्यानंतर पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांनी मंदिराच्या दोन घुमटांना झाकण्यासाठी सुमारे २२ मण म्हणजेच एक टन सोने दान केले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami