संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

कारेगावमध्ये ट्रॅक्टरच्या
धडकेने शिक्षकाचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शिक्रापूर:

वढू बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकाचा पुणे-नगर महामार्गावर कारेगावनजीक अपघाती मृत्यू झाला. संजय सीताराम कदम असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. संजय कदम यांच्या निधनाच्या बातमीमुळे विद्यार्थ्यांसह गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

कदम हे दुचाकीहून वाडेगव्हाण येथे जात असताना कारेगाव नजीक त्यांना फोन आल्याने ते दुचाकी रस्त्याचे कडेला घेऊन फोनवर बोलत होते. त्यावेळी पाठीमागून दोन ट्रेलर घेऊन भरधाव आलेल्या ट्रॅक्टरची कदम यांना धडक बसल्याने कदम रस्त्याचे कडेला पडले.त्यानंतर पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना शिरुर येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत राजेंद्र बाळासाहेब धुमाळ यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी ट्रॅक्टर चालक महेश किसन चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या