संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

काबूलमध्ये दूतावासाबाहेर आत्मघातकी हल्ला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

काबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील रशियन दूतावासाजवळ पुन्हा एकदा आत्मघातकी हल्ला झाला आहे. या स्फोटात 2 रशियन राजनैतिक अधिकार्‍यांसह 20 जणांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलांच्या गोळीबारात फिदाईन दहशतवादी ठार झाला आहे. अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर बहुतेक देशांनी काबुल मधील आपली दूतावास बंद केली होती. काही मोजक्या देशांची काबूलमध्ये दूतावास आहेत. त्यामध्ये रशियाचे एक दूतावास आहे. रशियाने तालिबानला अधिकृत मान्यता दिलेली नाही. अत्यावश्यक सेवा पुरवठ्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे.तालिबान सत्तेवर आल्यानंतर अफगाणिस्तानमधील हिंसाचार कमी झाल्याचे मानले जात होते. परंतु अलिकडच्या काही महिन्यांत तेथे अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत. बहुतांश हल्ल्यांमध्ये अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यात आले. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. आयएस हा देखील तालिबानसारखा एक सुन्नी इस्लामिक गट आहे. परंतु ते दोघे वैचारिक आधारावर एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. अफगाणिस्तान मधील तालिबान अधिकारी इस्लामिक स्टेटचा पराभव झाल्याचा दावा करतात. परंतु तज्ज्ञांचा असा विश्‍वास आहे की अफगाण सुरक्षेचे रक्षण करणे सध्याच्या सरकारांसमोर एक
आव्हान आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami