संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

काठमांडूत कॉलराच्या फैलावामुळे पाणीपुरी विक्रीवर बंदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने नेपाळच्या काठमांडू खोर्‍यातील ललितपूर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी घातली आहे.तेथे आतापर्यंत कॉलराचे 12 रुग्ण आढळून आले असून पाणीपुरीच्या पाण्यातूनच कॉलराचे विषाणू पसरले आहे. तसे नमूने देखील सापडले असल्याचा दावा शहर प्रशासनाकडून करण्यात आला.
एपिडेमिओलॉजी आणि रोग नियंत्रण विभागाचे संचालक चुमनलाल दास यांनी सांगितले की, काठमांडू महानगरात कॉलराची पाच प्रकरणे आणि चंद्रगिरी नगरपालिका आणि बुधानीलकंठा नगरपालिकेत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, आरोग्य आणि लोकसंख्या मंत्रालयाने लोकांना कॉलराची लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जाण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: उन्हाळा आणि पावसाळ्यात अतिसार, कॉलरा आणि इतर जलजन्य आजारांचा फैलाव होत असल्याने सर्वांनी सतर्क राहण्याची विनंती मंत्रालयाने केली आहे. पोलीस प्रमुख सीताराम हचेथु यांनी सांगितले की, शहरात गर्दीच्या ठिकाणी आणि कॉरिडोअर क्षेत्रात पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तशा सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami