कर्जत- काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष रियाज बुबेरे यांनी मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहिर प्रवेश केला. कर्जत तालुक्यातील कळंब जिल्हापरिषद विभागातील मुस्लिम तसेच आदिवासी बांधवांचा शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला.
या पक्ष प्रवेशासाठी उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत यांनी विशेष प्रयत्न केले. सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी कळंब विभागातील अनेक सरपंच, माजी सरपंच आणि सदस्य यांचा पक्ष प्रवेश झाला. साळोख येथील माजी सरपंच आवेश उमर जुवारी, माजी सरपंच आसीम अमीन बुबेरे, माजी उपसरपंच अब्दुल सलाम शेख, माजी सदस्या मनीषा संतोष शिनोरे यांच्यासह गावातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला.