संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

कल्याण-तळोजा मेट्रो-१२ काम सुरु!
१५२१ कोटी रूपयांची निविदा जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कल्याण – ठाणे-भिवंडी- कल्याण या मेट्रोचे विस्तारित रूप समजल्या जाणार्‍या कल्याण – तळोजा मेट्रो – १२ या मार्गाचे काम लवकरच प्रगतीपथावर येणार आहे. कारण या मेट्रो -१२ च्या उभारणीला लवकरच सुरूवात होणार आहे. या मार्गिकेच्या उभारणीसाठी आणि मार्गातील १७ उन्नत स्थानकांच्या बांधकामासाठी एमएमआरडीएकडून १ हजार ५२१ कोटींची निविदा जाहीर करण्यात आली आहे.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी सतत प्रयत्न करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण येथील एका लोकार्पण कार्यक्रमात या मेट्रो-१२ मार्गाच्या कामाला लवकरच गती मिळेल असे म्हटले होते.त्यानंतर दोन दिवसांतच या कामासाठी १५२१ कोटी रूपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे.विशेष म्हणजे या मेट्रोचे काम निश्चित कालावधीच्या आधी म्हणजेच पुढील ३० महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार असून लवकरच ही मेट्रो- १२ प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.यामुळे कल्याण-डोंबिवली,ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमधील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.या प्रकल्पाची पायाभरणी लवकरच होणार आहे.२० किलोमीटर लांबीच्या या कल्याण-तळोजा या मेट्रो १२ अंतर्गत गणेश नगर, पिसावली गाव,गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव,सोनारपाडा, मानपाडा,हेदुटणे आणि कोळेगाव, निळजे गाव, वडवली(खुर्द), बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा या स्थानकांचा समावेश आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या