संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

कल्याण-डोंबिवली पालिकेचे ट्वीटर अकाऊंट हॅक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचे ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे केडीएमसीमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र केडीएमसीच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर क्रिप्टोमधील इथेरियम प्रमोशनचे ट्वीट केले जात आहे. मात्र काही वेळाने अकाऊंट रिकव्हर करण्यात यश आले असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे ॲाफिशल ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे.केडीएमसीच्या ट्वीटर अकाऊंटचं नाव विटालिक.ईटीएच असे नाव बदलण्यात आले असून गेल्या १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाला सेकंदाला किमान ३-४ ट्विट या अकाऊंटवर केले जात आहेत. इथेरियम ब्लॉक चेनच्या प्रमोशनचे ट्वीट केले जात आहे. या ट्वीटमध्ये एक लिंकही देण्यात आली होती. इथेरियम ब्लॉकचे मर्ज होणार आहे. त्यामुळे हे प्रमोशन केले जात असल्याचे म्हणण्यात आले होते. या ट्वीटमधील लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. पालिकेला याबाबत माहिती मिळताच पालिकेकडून तातडीने ट्वीटर अकाऊंट पुन्हा एकदा रिकव्हर करण्याचे काम सुरू करण्यात आले आणि आता हे अकाऊंट रिकव्हर करण्यात यश आले असल्याचंही माहिती देखील समोर आली आहे.
विशेषतः अलीकडे ट्विटर अकाउंट व्हेरिफाय होण्याचं प्रमाण वाढले असून, अनेक जण इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर अकाउंट व्हेरिफाय व्हावं आणि ब्लू टिक मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. पण याच प्रयत्नांचा फायदा सायबर गुन्हेगार घेऊ लागले असल्याचेच समोर आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami