संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

कलमाडींच्या पुणे फेस्टिवेहलला भाजप नेत्यांच्या गर्दीने आश्चर्य

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – पुण्याच्या राजकारणात एकेकाळी प्रचंड दबदबा असणारे काँग्रेसचे माजी नेते सुरेश कलमाडी यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि कलमाडी यांची हातमिळवणी होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.यासाठी निमित्त ठरला आहे तो, सुरेश कलमाडी यांचा पुणे फेस्टिव्हल. या सोहळ्याचे शुक्रवारी उद्घाटन होणार आहे. पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा, हे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कलमाडींच्या पुणे फेस्टिवेहलला भाजप नेत्यांच्या गर्दीने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

२०११ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळा प्रकरणामुळे सुरेश कलमाडी यांच्या राजकीय कारकीर्दीला ग्रहण लागलेहोते. त्यामुळे एकेकाळी पुणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या सुरेश कलमाडी यांची राजकीय इनिंग अचानक संपुष्टात आली होती. काँग्रेसने सुरेश कलमाडी यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. मात्र, गेली ११ वर्षे उलटूनही काँग्रेसने सुरेश कलमाडी यांना लांब ठेवले आहे. तर दुसरीकडे सुरेश कलमाडी हे राजकारणात तितकेसे सक्रिय नसले तरी ते काही प्रमाणात आपली राजकीय ताकद राखून आहेत.त्यामुळे ज्या कालमाडींवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप करून कारवाईची मागणी केली होती त्याच कालमाडींच्या मांडीला मांडी लावून भाजप नेते उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर सहा तारखेला होणाऱ्या मिस पुणे स्पर्धेला अमृता फडणवीस हजेरी लावणार आहेत . यावर हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे असे स्पष्टीकरण कालमाडींकडून देण्यात आले आहे. सुरेश कलमाडी यांच्याविरुद्धचा खटला अजूनही सुरु असल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता सुरेश कलमाडी यांनी स्वत:वरील कलंक धुवून काढण्यासाठी भाजपबरोबर जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे का, अशी चर्चा देखील आता रंगू लागली आहे.

एक काळ होता जेव्हा कलमाडी म्हणजे पुणे हे समीकरण होते. पुणे महापालिका कलमाडी गटाच्या ताब्यात होती. एवढंच काय तेव्हा पुण्यात निर्णय देखील कलमाडी हाऊसमधूनच व्हायचा. कर्वेरोडला लागून असलेलं दोन मजली कलमाडी हाऊस म्हणजे सत्तेचं केंद्रच होतं. तिथूनच पदांचे वाटप व्हायचे, असा तो काळ. कलमाडींचा पुणे फेस्टिव्हल म्हणजे डोळे दीपवणारा अनुभव असायचा. आजदेखील कलमाडी हे पुण्याच्या राजकारणात आपला प्रभाव राखून आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कलमाडी पक्षात आल्यास भाजपला निश्चितच फायदा होऊ शकतो.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami