संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

कलबुर्गीमध्ये लॉरीच्या धडकेनंतर बसला आग! ८ जणांचा होरपळून मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कलबुर्गी – कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यातील कमलापूर गावाच्या हद्दीत आज सकाळी एका खाजगी स्लीपर बस-लॉरीमध्ये भीषण धडक झाली. या धडकेने लागलेल्या आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

हैदराबादचे रहिवासी असलेले प्रवासी हैदराबाद येथील ऑरेज या संस्थेच्या खासगी बसने गेल्या दोन दिवसांपूर्वी गोव्याच्या पर्यटनासाठी गेले होते. गोव्यात पर्यटनस्थळांना भेटी देऊन हैदराबादकडे परतत होते. यावेळी गुलबर्गा शहराच्या बाहेर असलेल्या सोलापूर-हैदराबाद राज्यमार्गावर कमलापूर गावाजवळ समोरून येणार्‍या कंटेनरला बसने जोराची धडक दिली. या धडकेनंतर बस पुलाजवळ धडकली आणि आग लागली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. ही आग विझवण्यात आली आहे. बसमध्ये चालकासह ३५ प्रवासी होते. यातील १२ लोकांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र आगीत आठ जणांचा मृत्यू झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami