संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

कर्नाटक विधानसभा उपाध्यक्ष आनंद ममानी यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बंगळुरू- भाजपचे आमदार आणि कर्नाटक विधानसभेचे उपाध्यक्ष आनंद चंद्रशेखर ममानी यांचे शनिवारी रात्री खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. काही दिवसांपासून आजारी असलेल्या ममानींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती आज सकाळी त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

कर्नाटकच्या सौंदत्ती विधानसभा मतदारसंघातून आनंद ममानी तीन वेळा निवडून आले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेल्या ममानींची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली होती. विशेष म्हणजे १९९० च्या दशकात त्यांचे वडील चंद्रशेखर ममानी हेही विधानसभेचे उपाध्यक्ष होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami