संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

कर्नाटकात भाविकांवर काळाचा घाला! भीषण अपघातात ९ ठार, १२ जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बेंगळुरू- कर्नाटकच्या हासनमध्ये शनिवारी रात्री ११ च्या सुमारास दुःखद घटना घडली. टेम्पो ट्रॅव्हलर आणि दूध गाडीची समोरासमोर टक्कर झाली. त्यात टेम्पो ट्रॅव्हलमधील ९ भाविकांचा मृत्यू झाला. त्यात ४ लहान मुलांचा आणि एका ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. अपघातात अन्य १२ जण जखमी झाले आहेत. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर हे भाविक परतत असताना हा भीषण अपघात झाला.
कर्नाटकातीलच काही भाविक देवदर्शनासाठी हसनंबा मंदिरात गेले होते. देवदर्शनानंतर ते टेम्पो ट्रॅव्हलमधून घरी परत येत होते. त्यावेळी आरसिकरे तालुक्यातील गांधीनगरजवळ त्यांच्या मिनीबसची आणि दूध गाडीची समोरासमोर टक्कर झाली. त्यात नऊ जण ठार झाले. मृतांमध्ये २ महिला, ४ लहान मुले आणि एका वृद्धाचा समावेश आहे. या अपघातात अन्य १२ जण जबर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami