संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

कर्नाटकमधील पोलिस भरतीत ट्रान्सजेंडरसाठी आरक्षण जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बंगळुरू – राज्याच्या पोलिस भरतीत ट्रान्सजेंडरसाठी राखीव जागा ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. त्यानुसार ३,४८४ पोलिसांच्या भरतीत ७९ जागा ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथींसाठी राखीव ठेवल्या आहेत, अशी माहिती कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी दिली.
पोलिस भरतीबाबत कर्नाटक राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या भरतीत ट्रान्सजेंडर म्हणजेच तृतीयपंथींसाठी आरक्षण ठेवण्याचा ठेवले आहे. त्यानुसार राज्यात नव्याने भरती होणाऱ्या ३ हजार ४८४ पोलिस पदांच्या भरतीत ७९ जागा तृतीयपंथींसाठी राखीव ठेवल्या आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ ही आहे. भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास आहे. या पोलिस भरतीत ४२० जागा कल्याण-कर्नाटक येथील उमेदवारांसाठी राखीव आहेत. त्यातील ११ पदे तृतीयपंथींसाठी आरक्षित आहेत. कल्याण कर्नाटक हा ७ जिल्ह्यांचा एक विभाग आहे. पूर्वी तो निजामांचा प्रदेश होता. उर्वरित ३ हजार ६४ पदांपैकी ६८ जागा तृतीयपंथीयांसाठी राखीव आहेत. आरक्षणाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय घेतला, अशी माहिती त्यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami