नवी दिल्ली :- ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट वाढले. देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत असताना आता मात्र कोरोना रुग्ण वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्याभरात देशातील कोरोना रुग्णांमध्ये तीन पटीने वाढ झाली.
गेल्या २४ तासांत देशात ३२४ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २२ फेब्रुवारी रोजी ९५ नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, शुक्रवारी कोरोनाबाधितांची संख्या ३०० होती, आज हीच रुग्ण संख्या ३२४ वर पोहोचली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमुळे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ७९१ पर्यंत वाढली. कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे सरकार आणि नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या आता वाढत होत आहे. आतापर्यंत देशात एकूण ५ लाख ३० हजार ७७५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूची नोंद आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून केरळमध्येही एक जण दगावल्याची नोंद झाली.