संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

कन्हैयालाल हत्याकांड प्रकरण! 4 आरोपींना 10 दिवसांची कोठडी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

उदयपूर – जयपूर येथील एनआयए न्यायालयाने उदयपूर कन्हैयालाल हत्याकांडप्रकरणी अटक केलेल्या मोहम्मद रियाझ अख्तारी, गौस मोहम्मद आणि त्यांचे साथीदार आसिफ आणि मोहसीन यांना 10 दिवसांची एनआयए कोठडी दिली. सुनावणी दरम्यान, न्यायालयाच्या आवारात वकिलांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच आरोपींना फाशी देण्याची मागणी केली.

न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलिसांचे पथक आरोपींना घेऊन एटीएसच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या (एसओजी) कार्यालयात पोहोचले. एनआयएने एटीएसकडून सर्व कागदोपत्री पुरावे गोळा केले. यानंतर कन्हैयालाल हत्याकांडातील दोन मुख्य आरोपी मोहम्मद रियाज अख्तारी व गौस मोहम्मद, त्यांचे सहकारी आसिफ आणि मोहसीन या चार आरोपींना एनआयए आणि एटीएसच्या पथकाने न्यायालयात हजर केले. सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय आणि शहर परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami